Monday, December 6, 2021

उज्जैनमधील मंदिरात अक्षय कुमार दिसला शंकराच्या अवतारात !

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षयकडे आजकाल चित्रपटांची रांग लागली आहे. आता त्याने त्याच्या आगामी चित्रपट OMG 2 च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये तो भगवान शिवाच्या अवतारात दिसत आहे. पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले – करता करे ना कर सके. शिव करे सो होए. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. OMG 2, आम्ही तुमच्यासमोर एक महत्वाचा सामाजिक मुद्दा घेऊन येत आहोत. या प्रवासातून आदियोगींची शाश्वत ऊर्जा आपल्याला आशीर्वाद देवो. सर्वत्र शिव.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles